![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विक्तुबाबा नगर कामठी येथील 12 वीतील विद्यार्थी वर झालेला सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खून अद्यापही कामठीवासी विसरले नाहीत, मात्र त्याच विक्तु बाबा नगरातील 13 वर्षीय अल्पवयीन 7 व्या वर्गातील विद्यार्थीनी जवळपास 25 दिवसा पासुन बेपत्ता आहे, नवीन कामठी पोलिस विभाग फक्त नोंद घेऊन थंड बसले आहेत. आश्चर्या ची बाब म्हणजे तक्रार देणाऱ्या आजीने तिच्या नातनीला कुणी पळवून नेले या बाबत तक्रार नोंदविणाऱ्या अधिकारीला स्पष्ट सांगितले आहे. पण अधिकाऱ्याने तोरा दाखवुन तक्रारी ची नोंद घेतली हे इथं विशेष!
आदर्श आचारसंहिता च्या नावाखाली तपास फायलित ठेवणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी अल्पवयीन दलित मूलीचा आतातरी शोध घेतील का ?
हा गंभीर प्रश्न ठाकला आहे…..
बॉक्स:-यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की तपास कसोशीने सुरू आहे लवकरच या प्रकरणाचा छडा लावून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लावून सुखरूप तिच्या आजीच्या स्वाधीन करण्यात येईल.