जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर तर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : जय दुर्गा उत्सव महिला मंडळ, टेलिकॉम नगर ह्यांच्या तर्फे जागतिक महिला दिनानिमित्य नुकताच महिला एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या प्रसंगी प्रताप नगर मधील प्रतिष्ठित महिला डॉ. हर्षा वाकोडकर ( अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी), डॉ उज्वला दातारकर (प्रख्यात दंतरोग चिकित्सक) , समाजसेविका माणिक जोशी (संस्थापीका : टेलिकॉम नगर सखी मंडळ )  वंदना सांडे (माजी नायब तहसीलदार ) आणि महिला पुरोहित  मरघडे काकू ह्यांना त्यांच्या समाजयोगी कार्याबद्दल गौरविण्यात आले मान्यवरांनी उपस्थित टेलिकॉम नगर मधील सर्व महिलांना विविध आरोग्य विषयी तसेच इतर विषयासंबंधी मार्गदर्शन केले. ह्याप्रसंगी महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच उपस्थित जवळपास १०० महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

जय दुर्गा उत्सव महिला मंडळ तर्फे अंजली लोहट , वर्षा मुदलियार , जयश्री चौधरी, प्रियांका गुप्ता आणि वर्षा चौधरी ह्यांनी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला.

स्मिता द्रवेकर आणि दीपा चौधरी ह्यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि मान्यवरांचा परिचय उपस्थित महिलांना करून दिला तसेच चित्रा नायडू ह्यांनी आभार प्रदर्शन केले .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com