मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करा

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

अमरावती : मेळघाटमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

            अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे  50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री  शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दूषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचे  निर्देशही त्यांनी दिले.

            दूषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. या सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र सदनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन

Sun Jul 10 , 2022
 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदन परिसरातील महापुरुषांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com