कामठी तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कोसळधाराने शेकडो एकरातील पिकांना फटका

कामठी :- पावसाळ्याच्या ऋतूत बरेच दिवस झालेल्या पावसाच्या विश्रांती नंतर आज 20 जुलैच्या पहाटे पाच वाजेपासून कामठी तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून दिवसभर झालेल्या पावसाच्या या कोसळधाराणे नागरिकाचे जनजीवन प्रभावीत झाले तसेच नागरिकांचया घरात पावसाचे पाणी शिरल्याने व रस्ते, नाले तलावसदृश्य झाल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण झाली.आज दिवसभर झालेल्या अति पावसामुळे कामठी तालुक्यातील केम शिवणी पळसाड गावाचा संपर्क तुटला होता तसेच खेडी गावातील 23 मजूर पावसाच्या परत अडकले होते.अखेर त्यांना एसडी आरएफ च्या मदतीने सुखरूप पोहोचवण्यात आले.अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशांनव्ये कामठी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या,सर्व माध्यमांच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळाना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला होता या इशाऱ्याचे भाकीत खरे ठरले व आज 20 जुलै च्या पहाटेपासून कामठी तालुक्यात चांगलाच जोरदार पाऊस झाला.

पावसाच्या या जोरदार सरीमुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे कंठीण झाले होते.कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण सहन करावी लागली.तसेच कामठी बस स्थांनकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने प्रवासांना चांगलाच फटका बसला तसेच एस टी बसेस ह्या बस स्थानका समोरूनच उभे राहून प्रवासीना बसवून घेत होते. कामठी तालुक्यातील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेल्याने शेकडो एकरातील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

– पावसादरम्यान तहसीलदार गणेश जगदाडे,नगर परिषद प्रशासक संदीप बोरकर यांनी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात पाहणी करत परिस्थितीची माहिती घेतली. तहसीलदार गणेश जगदाळे यांनी भर पावसात वेगवेगळ्या भागात पाहनी केली .तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून सर्व अधिकारी संपर्कात आहेत.प्रशासन अलर्ट असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली.

– कामठी शहरातील ड्रॅगन पॅलेस भुयारी पुलियाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते .दोन ते तीन फुटा पर्यंत असलेल्या पाण्यातुन वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत होती.

– कामठी बस स्थानक परिसरात जमा झालेल्या पावसाचे निकासी करण्याची सोय नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने संपूर्ण बस स्थानक परिसर जलमय होत बस स्थानक परिसराला जणू काही तळ्याचेच स्वरूप आले होते.

– कामठी तालुक्यातील केम-शिवणी पुलिया मार्गाहून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता तसेच केम पळसाद गावाचा रस्ता बंद करण्यात आला होता.

– खेडी गावा एकूण 23 मजूर अडकल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ पथकाचा सहारा घ्यावा लागला. व बोटीच्या साहाय्याने या सर्व मजुरांना यशस्वीरित्या सुखरूप बाहेर काढण्यात आले ज्यामुळे जीवितहानी टळली.

यामध्ये तहसीलदार गणेश जगदाळे,नायब तहसीलदार राजीव बमनोटे,उपसरपंच नामदेव ठाकरे, तलाठी विनोद डोळस, पोलिस पाटील तसेच सचिन घोडमारे, धीरज ढवळे, मेघराज म्हस्के यांनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पावसाच्या पुरात अडकलेल्या चार कुटुंबातील 23 मजुरांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यशप्राप्त

Sat Jul 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्ट नुसार आज 20 जुलै ला पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेल्या संततधार मुसळधार पावसाने कामठी तालुक्याला चांगलाच दणका दिला. यात एका दिवसात जवळपास 70 मी मी पावसाची नोंद करण्यात आली.तर झालेल्या संततधार पावसामुळे कामठी तालुक्यातील खेडी गावातील 4 कुटूंबातील 23 मजूर पावसाच्या पुरात अडकल्याची माहिती कळताच तहसिलदार गणेश जगदाळे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com