डॉ.स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी – कृषी मंत्री धनंजय मुंडे

– कृषी शात्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

मुंबई :- सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करून मुंडे यांनी डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामीनाथन यांनी गहू, तांदूळ आदी धान्याचे अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले.

विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात संशोधन केले. डॉ.स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'नारे तकबिर अल्ला हो अकबर' च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

Thu Sep 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – ईद ए मिलादुन्नबी निमित्त कामठीत भव्य ‘मिरवणूक’श्री गणेश विसर्जनामुळे उत्सव मर्यादित करण्यात मुस्लिम समाजबांधवांचे सामंजस्य कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज 29 सप्टेंबर ला कामठीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर ‘च्या गजराने संपूर्ण कामठी शहर दुमदुमले होते.आजच्याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com