नागपूर :- आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाचा आनंद नागरिकांमध्ये जाऊन साजरा केला आणि येणाऱ्या काळात अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त झाल्यावर लोकशाहीचा विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे पत्रकारांना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा इट्रीम न्याय आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन दिला.
पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे नागपूर, डॉ. शाहिद अली जाफरी महाराष्ट्र राज्याचे सचिव, सोनू फटिंग महाराष्ट्र राज्य सचिव, डॉ.अमेय नारनवरे नागपूर महासचिव, अरुणज्योती कन्हेरे नागपूरच्या महासचिव, महेश बावनकुळे नागपूर कोषाध्यक्ष व मीडिया प्रमुख, सचिन वाघाडे मीडिया प्रमुख नागपूर आणि चंद्रशेखर पराड नागपूर शहर उपाध्यक्ष यांची उपस्थिती मंचावर होती.