हृदयरोग, कॅन्सर, पचन क्रिया, मधुमेह इ. सर्व दुर्धर आजारांवर 325 रूग्नांची तज्ञांकडून तपासणी व उपचार

देसाईगंज :- संत निरंकारी मंडळ, शाखा वडसा (देसाईगंज) च्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. यात डॉ. पुरुषोत्तम आरोय, M.D हृदयरोग तख, हुबली, कर्नाटक, डॉ. मनीष मोतीलाल जेठगनी, M.S. सर्जिकल ऑन्कोलाजी (कॅन्सर) मुंबई, डॉ. कंचन सच्चानन्दानी, M.S सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, मुंबई, डॉ. अंकिता केणी, मुंबई, डॉ. प्रिया मोतीलाल नेठानी, पुणे, डॉ. कोसे, डॉ. गोरख सहारे, डॉ. सोहेल खान तसेच ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य तपासनी कर्मचारी करिश्मा हर्षे, प्रयोगशाळा तंश, ज्ञानेश्वरी दुधवडे, परिचारिका इ. यांनी सकीय सहभाग घेवून आरोग्य निदान शिबीरात आलेल्या 325 रूग्णंची तपासणी व उपचार पूर्ण केला.

शिबीराचे उद्‌घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते किटान नागदेवे, सोनल इंचार्ज, संत निरंकारी मंडळ यांचे अध्यक्षते खाली व आसाराम निरंकारी, संयोजक, हरिषकुमार निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, माधवदास निशंकरी, मुखी कुरखेडा, व सर्व तज्ञ डॉक्टर यांचे प्रमुख उपस्थितीत संपण्ण झाले.

उद्द्घाटन पर संबोधनात मानवसेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवाकार्य है निरंकारी मिशन ची ओळख असल्याचे त्यांनी नमूद करून मिशनच्या रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन इ. सेवाकार्या ची मुक्त कंठाने प्रशंसा केली. रोगनिदान शिबीरासाठी उत्तम व्यवस्था करण्यांत आली होती.

औषधीचे मोफत वितरण करण्यांत आले व सर्वांसाठी महाप्रसादाची ही व्यवस्था करण्यांत आली होती. शिबीराला यशस्वी करण्यांसाठी सेवादलचे सर्व स्त्री पुरुष सदस्यांनी गणवेषात सेवा दिल्या. कार्यकमाची प्रस्तावना हरिष निरंकारी तसेच संचालन नानक कुकरेजा व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डैगानी यांनी केले. यावेळी सर्व तज्ञ डॉक्टरांना निरंकारी मिशन चे काही प्रकाशन पुस्तके भेट करण्यांत आली.

शिबीराला यशस्वी केल्याबद्दल व सहकार्याबद्दल किशन नागदेवे, झोनल इंचार्ज व संत निरंकारी मंडळाचे वडसा शाखेने सवच्चेि आभार व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हरिभाऊ बागडे - राज्यपाल राधाकृष्णन भेट

Sat Aug 24 , 2024
मुंबई :-महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!