नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ए.आय.ई. एस.ई.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२२ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आजादीका अमृत महोत्सव तसेच रन फॉर ग्लोबल गोल्स यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. २१ किमी, १० किमी आणि ३ किमी अशा तीन गटामध्ये हे मॅरेथॉन होणार असून यामध्ये आरोग्य जनजागृतीच्या संदेशासह नागपूरकर सहभागी होणार आहेत.
रजिस्ट्रेशनसाठी दिली गेलेली लिंक : linktr.ee/AIESECinNagpurMarathon
गतिविधि नोंद करण्यासाठी स्ट्रावाऍपइनस्टॉल करणे महत्वाचा आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील मैदानातून या स्पर्धेला सुरूवात होईल व याचे समापन विधी महाविद्यालयाजवळ होईल. रविवारी (२ जानेवारी) सकाळी ५.४५ वाजता २१ किमी अंतराच्या स्पर्धेला सुरूवात होईल. यानंतर सकाळी ६ वाजता १० किमी आणि सकाळी ६.१५ वाजता ३ किमी अंतराच्या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. कोविडचे सर्वे गाइडलाइन्स पाळले जातील.
मार्ग
लॉ कॉलेज चौक, अलंकार चौक, युनिव्हसिटी लायब्ररी चौक, महाराजबाग चौक, व्हेरायटी चौक, झिरोमाईल, संविधान चौक, कस्तुरचंद पार्की, लिबर्टी टॉकीज़, व्हि.सी.ए चौक, तिरपुडे कॉलेज, जापाणी गार्डन चौक, मो. रफी चौक, जीपीओ चौक राजाराणी चौक, अहिंसा चौक, रविन पाण्याची टाकी, वॉकर्सस्ट्रिट, जापणी गार्डन चौक, होलीरोजरी चर्च, टीव्ही टावर मेट्रो रेलऑफीस एअरफोर्स, तेलखेडी फुटाळा चौक, रविनगर चौक, लॉ कॉलेज चौक येथे समाप्त.
रोख बक्षिस
२१ कि. : | १ला बक्षीस – ७०००/-
२रा बक्षीस – ५०००/- ३रा बक्षीस – ३०००/- |
१० कि. : | १ला बक्षीस – ५०००/-
२रा बक्षीस – ३०००/- ३रा बक्षीस – २०००/- |
३ कि. (सर्वांसाठीखुले): | १ला बक्षीस – गिफ्टहैंपर
२रा बक्षीस – गिफ्टहैंपर ३रा बक्षीस – गिफ्टहैंपर |
नागरिकांना आरोग्याबद्दल जागरूक करणे, त्यांना फिटनेससाठी प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रातर्फे घोषित झालेल्या १७ व्या शास्वत विकास ध्येयांबद्दल सुद्धा नागरिकांमध्ये या निमित्ताने जनजागृती करण्याचा उद्देश आहे. मॅरेथॉनमध्ये सर्व स्पर्धक या १७ व्या ध्येयांसाठी धावणार आहेत. या माध्यमातून शास्वत विकास ध्येय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भेडसावणा-या पर्यावरणीय समस्यांबद्दल युवकांना जाणीव होईल आणि या ध्येयाबद्दल जाणीव करणे हा या मॉरेथोंनचा मुख्य उद्देश आहे. असे नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितले.
युवांची संगठना ए.आय.ई.एस.ई.सी. जागतिक स्तरावर युवकांना संयुक्त राष्ट्राबद्दल सतत माहिती देऊन त्यांना जागरूक करण्याचे काम करीत आहे. संस्थेतर्फे आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त युवकांमध्ये जगातील समस्येबद्दल जागरूकतानिर्माणकरण्यातआली आहे. नागपूर चॅप्टर २०११ पासून यामध्ये काम करीत आहे.