पारशिवनी पोलिस स्टेशन च्या सभागृहात जेष्ठ नागरिकाची बैठक संपन्न.

पारशिवनी :- पोलिस स्टेशन पारशिवनीच्या सभागृहात आज बुद्धवार दिनांक 30/ नवबर /2022 रोजी दुपारी १.00 ते २.०० वाजता दरम्यान पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे  पोलीस स्टेशन पारशिवणी यांचे मार्गदर्शनात कम्युनिटी पोलिसिंग संबंधाने जेस्ट नागरिक यांची मिटिंग घेण्यात आली व सलोखाचे सबंध राहणे . मिटिंग दरम्यान त्यांचा समस्या बाबत चर्चा करून त्यांना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारण्यात आले तसेच बालविवाह, बालमजुरी, अपघात, व कोणताही प्रकारे त्रास असल्यास लगेच आम्हला कळविण्यात यावे बाबत चर्चा करण्यात आली या प्रसंगी अडॅ. भगवान बोकड़े, केशव पोकळे, फजितराव कोरडे, रामहरी दापुरकर, दत्तुभाउ डेकाटे, यादवराव बावनकुळे, सह अधिकतर जेष्ठ नागरिक बैठकित हजर होते कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलिस कास्टेबल राकेश बधाते यांनी व्यक्त केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com