आई खेळू देत नाही म्हणून त्याने सोडले घर

– सजग प्रवाशाने दिले पोलिसात

नागपूर :-आईच्या रागावर एका चिमुकल्याने चक्क घर सोडले. आई खेळू देत नाही, नेहमीच रागावते. या कारणावरून सहाव्या वर्गातील मुलगा घरून निघाला. रेल्वे स्थानकावर भटकत असताना एका सजग प्रवाशाने त्याला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी लगेच त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तासाभर्‍यात त्याचे पालक पोलिस ठाण्यात पोहोचले आणि मुलाला घेवून गेले. सजग प्रवाशाच्या तत्परतेने एक चिमुकला असामाजिकतत्वाच्या हाती लागण्यापासून वाचला.

मानव महल्ले (रा. काटोल) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. तो सहाव्या वर्गात शिकतो. आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने घरात सर्वांच्या लाडका आहे. मुलाने अभ्यास करावा, चांगले शिक्षण घ्यावे अशी पालकांची ईच्छा. मात्र, मानवचे अभ्यासात काही लक्ष लागत नव्हते. तो सतत खेळात मग्न असायचा. नेहमी प्रमाणे बुधवारी दुपारी सुध्दा तो खेळायला गेला. आई त्याच्यावर प्रचंड रागावली. आईचा राग मनात धरून त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आई बाहेर जाताच मानव दुपारी एक वाजता घराबाहेर पडला. बस स्थानकावरुन नागपूरला जाणार्‍या बसमध्ये बसला. मात्र, वाहकाने त्याची साधी विचारपूसही केली नाही. विना तिकीट तो नागपुरात पोहोचला.

पायी पायी नागपूर रेल्वे स्थानकावर आला. फलाट क्रमांक 7 वर तो भटकत होता. असामाजिकतत्वाच्या हाती लागण्यापुर्वी एक सज्जन प्रवासी आशिष पौणिकर याचे लक्ष मानवकडे गेले. त्याने मानवची विचारपूस केली असता सारा प्रकार लक्षात आला. त्याने मानवला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस हवालदार रंजना कोल्हे यांनी मानवची आस्थेनी विचारपूस केली. त्याच्या वडिलाशी संपर्क साधला. तत्पूर्वी विना भलावी, वनिता खडसे, प्रणाली चातरकर यांनी मानवला अभ्यासाविषयी सांगितले. तासाभर्‍यात मानवचे वडिल आले. पोलिसांनी खात्री करून मानवला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

Thu Oct 5 , 2023
नागपूर :- स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीद्वारा (Death Audit Committee) बुधवार (ता.04) नागपूर शहरातील स्वाईन फ्ल्यू मुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सुक्ष्मजिव शास्त्रचे सहयोगी प्राध्यापक डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com