चाकूने स्वत:चा गळा चिरून घेतला जीव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर,रामगढ येथे पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून संतप्त पतीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने स्वतःचा गळा चिरून जीव घेतल्याची घटना काल रात्री दहा दरम्यान घडली असून मृतक पतीचे नाव अफरोज खा जावेद खा पठाण वय 27 वर्षे रा आनंद नगर,रामगढ कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा खाजगी स्वरूपात रोजंदारी स्वरूपात पेंटिंगचे काम करीत असून .काल रात्री साडे नऊ दरम्यान राहत्या घरी पत्नीसह वाद झाला असता त्या वादाचा सोडवणूक करीत मध्यस्थी करण्यासाठी मृतकाच्या पत्नीचे नातेवाईक तसेच मेहुनी व सासू समजूत घालायला आले असता सदर मृतकाने रागाच्या भ्रमात घरातील भाजी कापण्याच्या चाकूने स्वतःच्या गळ्यावर चाकूने चिरला असता घरमंडळींनी त्वरित आशा हॉस्पिटल येथे उपचारार्थ हलविण्यात आले मात्र तोवर मरण पावला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांनी मृतकाची पत्नी फिर्यादी गुलशन आरा अफरोज खान वय 25 वर्षे रा आनंद नगर रामगढ,कामठी च्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पूढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाद्वारे ५० गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

Wed Jul 31 , 2024
– शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त सफाई कर्मचारी प्रोत्साहित – दरमहा झोननिहाय कार्यक्रम घेण्याचे उपायुक्त डॉ. महल्ले यांचे आवाहन   नागपूर :- शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असणाऱ्या गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता: 31) सत्कार करण्यात आला. संपूर्ण शहरात सेवा देणाऱ्या मनपाच्या ५० गुणवंत सफाई कामगार व ऐवजदार सफाई कामगारांचा घनकचरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com