– श्री दंत्त मंदीर कांद्री येथे गोपाल काला व भव्य महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
कन्हान :- श्री दत्तात्रेय जयंती निमित्य भाविक मंच कांद्री-कन्हान व्दारे श्री दंत्त मंदीर कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताह सह श्री दत्तात्रेय जयंती महो त्सवाची गोपाल काल्याचे किर्तन, काला प्रसाद वितरण सह भव्य महाप्रसादा ने श्री दत्तात्रेय जयंती महोत्सवाची थाटात संपन्न करण्यात आला.
रविवार (दि.८) ते शनिवार (दि.१४) डीसेंबर २०२४ पर्यंत श्री दंत मंदीर कांद्री येथे श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव सोहळा भाविक मंच कमेटी कांद्री-कन्हान व्दारे आयोजित केला होता. रविवार (दि.८) ला दुपारी १२ वाजता घटस्थापना व ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचा सुरूवात करून दररोज सकाळी ६ ते ७ काकडा भजन, सकाळी ७.३० ते ९.३० व दुपारी ४ ते ५.३० श्रीमद भागवत पारायण, दुपारी १२.३० ते ३.३० महिला मंडळ कांद्री व्दारे रामायण पाठ, सायं. ६ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० भारूड, किर्तन आणि हरिभजन आदी कार्यक्रमाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.
रविवार (दि.१५) डीसेंबर २०२४ ला सकाळी ९ ते ११ पर्यंत श्री दत्तात्रेय मुर्तीचा अभिषेक, हवन, पुजन व दुपारी १ से ३ पर्यंत ह.भ.प. श्रीमती ज्योतीताई झोडे मु. नाकाडोंगरी यांचे गोपाल काल्याचे किर्तन आणि काल्याचा प्रसाद वाटप त्यानंतर सायं. ५ वाजे पासुन भव्य महाप्रसाद वितरण करून श्री दंत्तात्रेय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. परिसरातील सर्व भाविकांनी तन-मन-धन अर्पण करून उपस्थित राहुन मानव देहाच्या आत्मकल्याणा करिता आनंदमय धार्मिक संधीचा लाभ घऊन तुप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भाविक मंच कमेटी कांद्री – कन्हान चे कवडू आखरे, गणेश भक्ते, नरेश पोटभरे, इंद्रपाल वंजारी, बंटी आखरे, नरेश कामडे, गणेश हटवार, विशाल कामडे, राहुल मस्के, नाना आखरे, नरेश देशमुख, रामजी हीवरकर, मारोती कुंभल कर, रामचंद्र हटवार, पुरुषोत्तम वझे, सुनील ढोबळे, विलास बावनकुळे, रोशन किरपान, गणेश किरपान, शिवाजी चकोले, भावेश सरोदे, शोभा वझे, हिरा वंजारी, माला भक्ते, उज्वला भक्ते, आशा हटवार, मंगला कामडे, मिरा पारधी, कुणाल पारस्डे, राजेश भक्ते, कार्तिक थोटे, धर्मेंद्र आखरें आदी सह ग्रामस्थानी परिश्रम केले.