मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना, राज्यातील जनतेला आणि सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांना सुखाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो.
प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अश्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण नववर्ष ही उत्तम संधी आहे. हे स्वप्न साकार करताना उद्यमशीलता व संत विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर लोकांची भूमी आहे. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.