संदीप कांबळे, कामठी
-श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा चा स्वर्ण महोत्सव वर्ष
कामठी ता प्र 17:-मंगळवार 18 एप्रिल 1973 ला प्रभू श्री रामाच्या कृपेने कामठी चे स्व.किसनलाल शर्मा व स्व पुरणलाल सीरिया तसेच त्यांचे सहयोगी मित्र स्व .संतोशराव रडके, स्व.सरजूप्रसाद केशरवाणी, महादेव पटेल यांनी श्रद्धा भावनेतून रामभक्त श्री हनुमानजी ची शोभायात्रा काढण्यास सुरुवात केली होतो ही सुरुवात परंपरागत कायम ठेवत आज एक विशाल वृक्ष निर्माण होवून कामठी शहराचा एक उत्सव बनला आहे.या उत्सवात सर्व धर्म बांधव सहभाग घेत सामाजिक एकतेसह ,कौमी एकतेचा संदेश देतात .सन 1973 या वर्षांपासून निघणारी श्री हनुमान जयंती उत्सव शोभायात्रेचा यावर्षी 50 वा वर्ष असून यानुसार ही श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा आज रविवारी 17 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता येथील गांधी चौकातून काढण्यात आली.सर्वप्रथम 15 फूट उंचीच्या हनुमानजीच्या विराट प्रतिमा मूर्तीचे पूजन नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी खासदार विलास मुत्तेमवार, , माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर, , माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर,जि प सदस्य दिनेश ढोले,माजी जिं प अध्यक्ष निशा सावरकर, माजी नगराध्यक्ष माया चवरे,कांग्रेस नेता प्रसन्ना तिड़के, माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी,माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर,बरीएम विदर्भ महासचिव अजय कदम, धीरज यादव,शिवसेनेचे पदाधिकारी राधेश्याम हटवार, मुकेश यादव, कामठी नगर परोषद चे माजी उपाद्यक्ष काशीनाथ प्रधान , भाजप कामठीचे माजी शहराध्यक्ष विवेक मंगतानी, माजी नगरसेवक श्रावण केळझरकर, लाला खंडेलवाल, नगरसेवक लालसिंग यादव,उज्वल रायबोले,माजी नगरसेवक कपिल गायधने, पंकज वर्मा, विजय कोंडुलवार,विनोद वाधवानी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
या शोभायात्रेत हनुमान मूर्तिसह रामदरबार, राजा दशरथा सोबत कौशल्या, पुष्पक विमान, हनुमान द्वारा लंकादहन , ताड़का वध, श्रीराम जन्म, लवकुश द्वारा अश्वमेघ यज्ञ, केवटची नाव, श्रीराम जानकी विवाह, वाल्मीकि दर्शन, असे विविध आकर्षक चित्ररथाचा समावेश होता .शोभयात्रेच्या मार्गत अनेक सामाजिक ,राजकीय , धार्मिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनाकड़ून शोभयात्रेच्या स्वागतासाठी स्वागत द्वाराची उभारनी तसेच अलपोहार, खाद्य पदार्थचे शितपेय आदिचे वितरण करण्यात आले होते ठिकठिकाणी पथदिव्यांची रोशनाई, सजीव देखावे लोकनृत्याची धूम व फटाकयाच्या आतिषबाजिने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले .
या शोभयात्रेच्या गांधी चौकातुन शुभारंभ होऊन गुजरी बाजार चौक, संत तुकडोजी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, लक्ष्मीनारायण मंदिर गुजरी बाजाराची परिक्रमा करित बॉम्बे स्टोर्स, तंबाकू ओली, गुड़ ओली चौक, परशुराम भवन मार्ग, फूल ओली, लाला ओली, लोहिया मार्ग, बोरकर चौक , खेतान मोहल्ला, जूनि भाजी मंड़ी, मदन चौक ते मच्चिपुल, शास्त्री चौक ,राम मंदिर, दाल ओली नं 2, नेताजी चौक, कांटी ओली, अग्रसेन चौक, किराना ओली, सत्तू हलवाई चौक , आदि मार्गे भ्रमण करित गंज के बालाजी मंदिर येथे शोभायात्रेचे विसर्जन करण्यात येणार आहे. याप्रसंगी परोसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शोभायात्रा यशस्वी पार पडावी यासाठी पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.