संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परम पराक्रमी हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी नगरातून माजी नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्या नेतृत्वात भव्य हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली होती याप्रसंगी हजारोच्या वर संख्येतील भक्तगणांनी शोभायात्रेत सहभाग दर्शविला होता.
या शोभयात्रेचा शुभारंभ माजी नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेची पूजा अर्चना करून ढोल ताश्याच्या गजरात डी जे च्या तालावर काढण्यात आली. दरम्यान भक्तगनात हनुमान जन्मोत्सवाचा मोठा उत्साह संचारला होता.ही मिरवणूक दुर्गादेवी नगरातून निघून शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत दुर्गादेवी नगरातून समापन करण्यात आले.
या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक काशिनाथ प्रधान, विनोद काटकर,पिंटू मेरखेड,हरीश माहूरे, प्रवीण सारवे,नरेंद्र सारवे,राजेश घुरले,पंकज बगडते,बंटी मते, राहुल मते,सुमित मेरखेड,रोहित मते,तेजस नरखेडकर,अमित बिरोले यासह दुर्गादेवी नगर च्या समस्त भक्तगणांनी मोलाची भूमिका साकारली.