संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन खेडाळुनी कास्य पदक पटकाविले
कन्हान :- सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा मध्ये गुरूकृपा आखाडा रामसरोवर टेकाडी येथील खेडाळु अर्जुन स्पोर्ट डुमरी येथुन प्रशिक्षण घेऊन उशु कराटे १८ वर्ष वयोगटात दोन खेडाळुनी कास्य पदक पटका वित वुशु कराटे खेळात खेडाळुनी दमदार सुरूवात केली आहे.
नागपूर येथे १२ ते २६ जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवात (दि. २० तारखेला पार पडलेल्या वुशु कराटे या क्रीडा प्रका रात गुरुकृपा आखाडा रामसरोवर टेकाडी चे सध्या अर्जुन स्पोर्ट डुमरी येथे प्रशिक्षण घेत असलेले १८ वर्ष वयोगटात गुरुकृपा आखाडाचे विद्यार्थी आदेश सुनिल अंबागडे वजन गट ४० ते ४५ कास्यपदक पटकावला तर अमोल बंडुजी कांबळे वजन गट ४५ ते ५० मध्ये कास्य पदक पटकावला.
गेल्या अनेक वर्षा पासुन गुरुकृपा आखाडा टेकाडी अनेक खेळांमध्ये विद्यार्थी घडवित असुन यामध्ये विशेष सहकार्य प्रदीप यादव प्रशिक्षक अर्जुन अकॅडमी डुमरी स्टेशन याचे असुन कमी दिवसांमध्ये या खेडाळु मुलानी प्रशिक्षण पूर्ण करून कास्य पदक प्राप्त केत्याबद्दल ग्रामस्था कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये खासदार महोत्सव क्रीडा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्याचे विद्यार्थी खेडाळु कोशिकि, मार्शल आर्ट व आष्टे-डू आखाडा स्पर्धे मध्ये सुद्धा सहभाग घेणार आहे. यास्त व गुरुकृपा आखाडाचे संस्थापक अध्यक्ष निलेश शालिकराम गाढवे, मनोज लेकुरवाडे, अमित वासाडे, देवेंद्र सिंगर, दिनेश चिमोटे आदी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहे.