नागपूर:- नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागात लैंगिक शोषणा विरुद्ध चा कायदा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादाचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विजय धांडे, एड रवींद्र वासे, एड विजय जांगडेकर, डॉ तुळसा डोंगरे, डॉ ज्वाला डोहाने, डॉ सुजित वनकर यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालीचे विद्यार्थी उत्तम शेवडे यांनी तर समापन प्रा ममता सुखदेवे यांनी केले.
याप्रसंगी प्रा पुष्पा ढाबरे, प्रा रोमा शिंगाडे, सरोज लामसोगे, प्रेमा भोयर, दिशा वानखेडे, सुभाष बोंदाडे, डॉ सरोज आगलावे, डॉअर्चना लाले, आर्याजी कुंदा, नंदा सांबारे, आशा कापसे, रंजना वनकर, निर्मला धाबडे, कविता जनबंधू, वैशाली सहारे, धनंजय सुखदेवे, भीमराव मेश्राम, हिरालाल मेश्राम, मोरेश्वर मंडपे, करुणा मून, नलू भगत, करुणा कराळे, अधीर बागडे, सिद्धार्थ फोपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.