अरोली :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथे बाजार चौकात गुढी उभारून व श्री शंकर देवस्थान चाचेर येथून नगरधन कोटेश्वर मंदिर ते रामटेक गढ मंदिर ते श्री नारायण टेकडी, अंबाडा या प्रकारे पदयात्रा काढून व शेवटी श्री शंकर देवस्थान चाचेर येथे समारोप करून गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला किशोर बरबटे, डॉ. दिनेश बादुले, किरण बरबटे, गोपीचंद राऊत दिलीप घाटे, चेतन टेभरे, चंदू देऊरकार सह श्री शंकर देवस्थान मंदिराचे सर्व कार्यकर्तेगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त चाचेरवासीयांनी सहकार्य केले.