कामठी रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाचे थाटात भूमीपूजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– रामगढ वासीयांसाठी 6 कोटी रुपयाच्या निधीतून फूट ओव्हर ब्रिज निर्माण होणार- विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे

कामठी :- मागील 10 वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश बलशाली होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांच्या कल्याणाचे कार्य हाती घेतले असून देशातील 25 कोटी गरीबांच्या कल्याणासाठी 45 योजना आखल्या आहेत.3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनांचा लाभ देत आहेत.तर अमृत भारत योजने अंतर्गत देशातील रेल्वे स्थानकाचा कायापालट करून रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याचे अमूल्य कार्य करीत रेल्वेचे जाळे विणले जात आहेत. तसेच कामठी शहर हे नागपूर चा एक भाग झाला असून कामठी शहराच्या विकासात कामठी रेल्वे स्थानकाचा विकास होणे नियोजित होते त्यानुसार अमृत भारत योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे आणि या रेल्वे स्टेशन च्या पुनर्विकास साठी मंजूर झालेल्या 7 कोटी 66 लक्ष रुपयांच्या निधीतून कामठी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होत आहे .कामठी शहर हे मेट्रोचे शहर झाल्याने या शहराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत कामठी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.तसेच कामठी येथील रामगढ वासीयांना कामठी शहरात येण्यासाठी पायी पायी जीव मुठीत घेऊन कामठी रेल्वे स्टेशन चे रेल्वे रूळ ओलांडून यावे लागते याप्रसंगी कुठलीही जीवितहानी न व्हावी ही बाब लक्षात घेता कामठी रेल्वे स्थानकावर नाविन्यपूर्ण योजनेतील 6 कोटी रुपयांच्या निधीतून फूट ओव्हर ब्रिज निर्माण करून देणार असल्याचे मौलिक प्रतिपादन नागपूर विधानपरिषद चे सदस्य व भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार आशिष देशमुख, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे तसेच नागपूर रेल्वे चे डी आर एम प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान स्वातंत्र्य सेनानी चा स्टेशन मास्तर सुरेश पाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेल्वेचे समस्त अधिकारी कर्मचारीसह मोठ्या संख्येत नागरिकगण उपस्थित होते.

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक विकसित करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार कामठी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 26 फेब्रुवारी रोजी आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी म्हणून रेल्वे चे जाळे विणले जात आहे. कामठी रेल्वे स्थानकाचा कायापालटासाठी 7 कोटी 66 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.त्यामुळे अत्याधुनिक सोयी-सुविधांसह कामठी रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार आहे अमृत भारत स्टेशन योजना एक दूरदर्शी उपक्रम आहे.. कामठी रेल्वे स्टेशन कायापालट

प्रकल्पासाठी 7 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर झाले असून यामध्ये प्रशस्त आणि आरामदायक प्रतिक्षालय,ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग्यासाठी एस्कीलेटर (सरकते जिणे), उद्यान व भुदृश्य ,स्टेशन बिल्डिंग चा नवीन आकर्षित स्वरूप, कार पार्किंग ची सुविधा,एक हाई मास्ट लाईट,दोन लिफ्ट,काँनफोर्स विकास,आकर्षित पोर्च,भुवनेश्वर मॉडेल शौचालय,दहा सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा विकास करण्यात येईल.तर अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेजस बहुउद्देशीय संस्था व्दारे शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार 

Mon Feb 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तेजस बहुउद्देशीय संस्था गेली सहा वर्षे राष्ट्रीय संत गाडगे बाबा महाराज यांची दहा कलमी कार्ये पार पाडण्यासाठी कार्यरत आहे. २३ फेब्रुवारी २००४ रोजी संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त शास्त्री चौक, कामठी येथील संस्थेच्या कार्यालयात दुपारी ४ वाजता पूजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुलेवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com