स्वामी रामानंद तीर्थ यांना विधान भवनात अभिवादन

मुंबई :- थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष अॅड्. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उप सभापतीचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबूडकर, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर 2023 एकूण निर्णय - 6

Tue Oct 3 , 2023
अन्न व नागरी पुरवठा दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा, मैदा, पोह्याचा देखील समावेश दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्य तेल असे ४ जिन्नस होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com