नागपूर :- “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक भारतरत्न नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी (23) विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवीन्द्र भेलावे, सुरेश बगळे यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राजेश गजभिये, राजेश लोहीतकर, अमोल तपासे, अमित कोल्हे, सुधीर कोठे, अनिल चव्हान इ. उपस्थित होते.