नागपूर :- राजपूत वंशातील पराक्रमी राजे महाराणा प्रताप यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात नायब तहसिलदार आर.के.डिघोळे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.