नागपूर :- थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.