नागपूर :- भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. भाजप उत्तर मंडलचे अध्यक्ष गणेश कानतोडे यांचे नेतृत्वात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी उत्तर मंडळचे पालक माजी आमदार गिरीश व्यास, शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हाथीबेड,संजय तरारे, राजेश बटवानी, अमित पांडे, गूरूमित बावरी,कमल मूलचंदानी, ओमप्रकाश इंगळे, रविन्द्र डोंगरे, रूनाल चव्हाण, केवल बागडे, रूपेश ठाकरे, राखी मानवटकर, दिलीप धोंगडे, इत्यादी उपस्थित होते.