नागपूर :- मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक व पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.