नवी मुंबई :- “स्वराज्य हा माझा जन्मसिदध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकीय तत्वज्ञ, संपादक आणि लेखक तसेच ‘लाल बाल पाल’ या त्रैमूर्तीमधील एक. भारतीय असंतोषाचे जनक. ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
लोकमान्य टिळकांनी पुणे येथे न्यु इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज सुरु केले. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ‘शिवजयंती’ उत्सवाला सुरुवात केली. जनजागृतीस्तव ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रे सुरु केली. टिळकांनी १९१६ मध्ये डॉ. ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने होमरुल लीग संघटनेची स्थापना केली. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार घेतला. गीतारहस्य, आर्क्टिक होम ऑफ वेदाज, ओरायन (वेदकाल निर्णय ) ही टिळकांचे प्रसिद्ध साहित्ये आहेत.