– उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सद्भावना दिनाची प्रतिज्ञा
मुंबई :- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येते, यानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते.