नागपूर :- वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे व राठोड आदी उपस्थित होते.