नागपूर :- देशाला एकतेच्या सुत्रात बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणारे देशभक्त, भारताचे प्रथम गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येते. ह्या निमित्ताने उपायुक्त विजय देशमुख यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची, भ्रष्टाचार निमूर्लनाची शपथ दिली.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकिय अधिकारी दिपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, नगर रचनाकार ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता मंगेश जाधव, विधी विभागाचे सूरज पारोचे, निगम अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, निवडणूक विभागाचे अनंत नागमोते, रितेश लोखंडे, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, जितेश धकाते, राजेश गजभिये, स्वप्नील खरे, विनोद डोंगरे, शैलेश जांभुळकर यांचे सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
घाट रोड वरील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाला सहा. आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे यांनी माल्यार्पण केले प्रसंगी सहा. अधिक्षक विश्वास कर्णूके, धर्मेंद्र पाटिल, अरुण तुर्केल, जितेंद्र हिरणवार, रुपेश सातपूते, अभिषेक कछवाह उपस्थित होते. तसेच शांतीनगर येथील माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्य पुतळयाला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.