मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारक ! ईद अल – अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या निमित्त वरील उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करुन एक उत्तम व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.