– ३० जानेवारी हुतात्मा दिन म.न.पा.तर्फे श्रध्दांजली
नागपूर :- देशाच्या स्वातंत्रयासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्माच्या स्मरणार्थ शनिवार (३० जानेवारी) रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून नागपूर महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हुतात्मा दिन पाळण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अति. आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी गांधींजींच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, सुरेश बगळे, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, प्रकाश खानझोडे आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. तसेच हुतात्मा स्मारक सुभाष रोड, बालोदयान येथे नगरीतर्फे पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यात आले. तसेच चितार ओळी, जुनी शुक्रवारी, सतरंजीपूरा, गंजीपेठ, सदर चौक स्थित गांधीजींच्या प्रतिमेला मनपातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले.