वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळयास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.           याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, निवृत्त जिल्हाधिकारी बी.के.नाईक, निवृत्त उप निबंधक शिवचरण शिरे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतराव नाईक यांच्या पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Sat Jul 1 , 2023
मुंबई :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली.राज्याचे पर्यटन,महिला व बालविकास, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी चंद्रकांत काकडे,सामान्य प्रशासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com