श्री” च्या पायी दिंडी पालखीचे कन्हान, कांद्रीला भव्य स्वागत

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

रांगोळया, फुलाच्या वर्षावाने स्वागत, चाय, काणी, केळी, फराळी पाकीट, बिस्कीट वितरण. 

 कन्हान (नागपुर) : – श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा शाही थाटात कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर सत्रापुर रोड कन्हान येथुन सकाळी प्रस्थान होऊन राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान कांद्री चे नगर भ्रमण करण्यात आले. यावेळी रस्त्यावर रागोळ या, फुल पाखळ्या टाकुन “श्री ” च्या पायी दिंडी पालखी यात्रेचे परिसरातील भाविक मंडळीने भव्य स्वागत सत्कार करून “श्री ” दर्शनाचा लाभ घेतला.             बुधवार (दि.४) जानेवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी नागपुरव्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा शाही थाटा त पावन कन्हान नदी काठावरील काली मंदीरातुन पुजा अर्चना, आरती करून सकाळी ६ वाजता प्रस्थान करून नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान नगर प्रदक्षिणा करित गणेश नगर, श्री हनुमान, श्री गजानन मंदीर तिवाडे ले-आऊट कन्हान, पांधन रोड ने आंबेडकर चौक राष्टीय महामार्गा वरील श्री गजानन सॉ मिल, श्री काकडे निवास येथे चाय, नास्ता तदंनत महामार्गाने श्री आखरे पेट्रोल पंप कांद्री येथे नास्ता नंतर बोरडा-नगरधन मार्गे “जय गजानन, जय गजानन”, “गण गण गणात बोते ” मुदुंग टाळाच्या गजरात श्री श्रेत्र रामटेक करिता प्रस्थान करण्यात आली. पालखीत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरुष वारकरी असुन यात पालखी चोपदार, पताकाधारी, गायनाचारी, मृदंगाचारी, टाळकरी, विणाधारी व फुलां नी सजलेल्या पालखीत “श्री गजानन महाराजांच्या मुर्ती दर्शनाचा मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

श्री गजानन महाराज पायी दिंडी पालखी यात्रे चे कन्हान शहरातील गणेश नगर चे अमोल प्रसाद हयानी काफी चे वितरण करून स्वागत केले. यशनंत निर्वाण, रामुजी ठाकरे, गणेश हर्षे, वसंतराव इंगोले, भुषण निंबाळकर, रंजित पाजुर्णे, बबनराव इंगोले, मडगे काकाजी, गितेश मोहणे, माघव काठोके, सुनिल सरोदे, अविनाश रायपुरे, उमेश काकडे आदीने स्वागत व पुजा केली. नगरसेविका गुंफाताई तिडके व सुर्यकांत तिडके, शेखर बोरकर हयानी केळी, फराळी पॉकीट, बिस्कीटचे वितरण करून स्वागत केले. श्री गणेश सेवा समिती व श्री हनुमान मंदीर समिती व्दारे चाय बिस्कीट चे वितरण करून स्वागत करण्यात आले. श्री गजानन सॉ मिल व काकडे परिवारव्दारे अल्पोहार चाय वितरण करून ” श्री ” दर्शनाचा लाभ घेतला.

जय शितला माता मंदिर द्वारे “श्री” च्या पालखी यात्रेचे जल्लोषात स्वागत. 

श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा शाही थाटात राष्टीय चारपदरी महामार्गाने कांद्री ला प्रवेश करताच जय शितला माता मंदिर कांद्री द्वारे पालखी यात्रेचे फुलाच्या वर्षाने आणि ११ किलो चे बुंदी लाडु वितरण करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संजय चौकसे, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, उषा मरघडे, हंसाबेण पटेल, किर्ती हटवार, लता बावनकुळे, प्रकाश हटवार, अशोक खैरकर, प्रेमचंद चव्हान सह भाविक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. तदंतर भुमिपुत्र सघटन व अतुल हजारे मित्र परिवार व्दारे पालखी सामोर पाच घोडयाची सलामी देत कांद्री गावाचे भ्रमण करून श्री आकरे निवास आणि आकरे पेट्रोल पंप येथे “श्री” पालखी च्या सर्व भाविकांना अल्पोहार व चाय वितरण करून “श्री” च्या दर्शना चा लाभ घेतला. तदंतर बोरडा रोड ने श्री संत गजानन पायी दिंडी पालखी यात्रा पुढे मार्गक्रमण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

In future, diabetics will need only one insulin dose a week

Thu Jan 5 , 2023
NAGPUR :- Injecting daily dose of insulin before having food is a part of routine for many people living with diabetes, be it type 1 or type 2. Many had to inject the insulin twice or thrice in a day as per requirements. This will soon become the thing of past. The future insulin will be glucose sensitive and ‘smart’. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com