फ्रिडम रायडर चे भंडारा मध्ये भव्य स्वागत, 75 बाइकर्सचा 25 हजार किलोमीटर प्रवास

भंडारा :- आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या 75 बाइकर्सचा ताफा 25 हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान भंडारा शहरात रविवारी पोहचला. भंडारा येथील क्रीडा प्रेमींनी धाडसी प्रवास्यांचा उत्साहात स्वागत केले. केंद्र व राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय खेल प्राधिकरण ऑल इंडीया मोटरबाइक एस्पिटिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील 75 बाइकर्स हे देशातील ऐतिहासीक स्थळांना भेटी देणार असून या रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता असणाऱ्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून हे सर्व 75 बाइकर्स स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना आरोग्य आणी फिटनेसचा संदेश प्रसारीत करुन भारतीय वारसा तसेच संस्कृती यावर एक माहितीपट तयार करण्यात येणार आहे. ही मोहीम 75 दिवसांची असून देशातील 34 राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 21,000 कि.मी.च्या प्रदेशामध्ये ही मोहीम चालविणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 75 Bike Rider यांचे खासदार सुनिल मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरीक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, भारतीय खेळ प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक श्रीनिवास माळेकर, सहाय्यक संचालक सुमेध तरोळेकर, वरिष्ठ मार्गदर्शक आशिष बॅनर्जी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक हितेंद्र वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बाइकर्सचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू व नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुलै-2022 सत्राकरिता इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेशास दि.7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Tue Nov 1 , 2022
अमरावती :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जुलै, 2022 सत्राकरिता पदव्युत्तर पदवी (एम.ए. इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, इंग्रजी, फिलॉसॉफी, हिंदी), एम. कॉम, स्नातक पदवी (बी.ए., बी.कॉम., बी.टी.एस, बी.कॉम ए.एफ., बी.ए.ऑनर्स), पदविका (डिप्लोमा), इत्यादी अभ्यासक्रमांकरिता इग्नोच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com