कन्हान :- मॉ काली मंदीर येथे नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे आगमण होताच मॉ काली माता मंदीर सेवा ट्रस्ट व्दारे भव्य स्वागत करून आरती, किर्तन व सर्व भक्तताना प्रसाद वितरण करून रात्री मुक्काम करण्यात आला. आज शनिवार ला पहाटे सकाळी आरती करून प्रस्थान आणि कन्हान, कांद्री नगराचे “जय गजानन, श्री गजानन ” जय घोष करित रामटेक कडे पालखी मार्गक्रमण करेल.
शुक्रवार (दि.३) जानेवारी २०२५ पहाटे सकाळी ५. १५ वाजता श्रीं ची आरती, आरती करून श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक, नागपुर येथुन संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे प्रस्थान होऊन श्री गजानन महाराज मंदिर प्रेमनगर येथे सकाळी ८ वा. श्री भवानी माता मंदीर कळमना येथे सकाळी १०.४० वा. फराळ पाणी, दु. १२.३० वा. कामठी येथे आगमन, मिरवणुक, दु. २.३० वा कामठी, मोदी राम मंदीर येथे श्री भक्त कामठी वासियां व्दारे दुपारचे जेवण तदंतर प्रवचन व अल्प विश्रांती, सायं. ५.४५ वा. काली माता मंदीर येथे पालखीचे आगमन होताच मॉ काली माता मंदीर सेवा ट्रस्ट, सत्रापुर कन्हान व्दारे भव्य स्वागत करून सायं. ७ ते ८.३० किर्तन व नंतर महाप्रसाद आणि मुक्काम करण्यात आला. आज शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ६.३० वा पालखी प्रस्थान, राष्ट्रीय महामार्गाने गणेशनगर, श्री हनुमान, गजानन मंदीर तीवाडे ले-आऊट येथुन पांधन रोडने कन्हान नगर प्रदक्षिणा करित स. ७.३० वा. श्री काकडे निवास येथे चाय नास्ता व विसावा, शितला माता मंदीर जे एन रोड येथे स्वागत नंतर कांद्री गाव प्रदक्षिणा करून जे एन दवाखाना चौक ते बोरडा – नगरधन मार्गे रामटेक कडे मार्गक्रमण करेल. या पालखी यात्रेत आपण सहभागी होऊन श्री गजानन महाराजांचे सोबत प्रभु श्रीरामचंद्रां चे दर्शनाचा लाभ घेऊन या मंगल प्रसंगाची आठवण साकार करावी असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपुर व्दारे करण्यात आले आहे.