अरोली :- येथून जवळच असलेल्या मोरगाव येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर यांच्या आदेशान्वये पाटील यांच्या भव्य पटांगणावर मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक हवन कार्य उद्या दिनांक 18 फेब्रुवारी मंगळवार ला आयोजित केले आहे.
18 फेब्रुवारी मंगळवारला सकाळी सात ते आठ वाजता सेवक अनिल देवगडे यांच्या निवासस्थानी हवनकार्य सकाळी साडेआठ ते दुपारी साडेअकरा दरम्यान शोभायात्रा व मिरवणूक ,दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत दीपप्रज्वलन व भगवंताचे स्वागत, मान्यवरांचे स्वागत, दुपारी एक ते साडेचार वाजता मानवधर्मावर आधारित चर्चा बैठक, सायंकाळी साडेचार वाजता महाप्रसाद व भजनाच्या कार्यक्रम रात्री आठ वाजता तीन अंकी नाट्यपुष्प कसोटी चे सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे उपाध्यक्ष मनोहर देशमुख, सचिव सुरजलाल अंबुले, सहसचिव मोरेश्वर गभणे ,कोषाध्यक्ष प्रवीण उराडे, संचालक फकीरा जिवकाटे वासुदेव पडोळे, संजय महाकाळकर ,विठ्ठल क्षीरसागर सह गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी पुढारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन परमपूज्य परमात्मा एक सेवक, सेविका ,बालसेवक मोरगाव यांनी केले आहे.