– शिवणगाव प्रकल्पग्रस्त गाव उठवण्यास स्थगिती देण्यात यावी
नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवणगाव प्रकल्पग्रस्त गाव उठवण्यास स्थगिती देण्यात यावी या मागणी करिता उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. जोपर्यंत शिवणगावातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरू व शिवणगावासीवांना न्याय मिळवून देऊ असे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी उपजिल्हाधिकारी यांना संबोधित केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष रोशनी खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष चंदू लाडे यांच्या मार्गदर्शनात तुषार गिऱ्हे यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ सात दिवसाच्या आत मध्ये स्थगिती न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिका घेतल्या जाईल. त्यावेळेस विभाग अध्यक्ष हर्षद दसरे चेतन शिराळकर महिला विभाग अध्यक्षा प्रिया बोरकुटे अजिंक्य मिश्रा आदित्य मानकर समशेर अन्सारी अंकुश मनीष भारद्वाज व इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व बरेच शिवणगाव वासी उपस्थित होते.