यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील वसंतपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतपुर येथे पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणू शासकीय आश्रमशाळा वसंतपुरचे मुख्याध्यापक बलराज राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. मंचावर उपस्थित लेखाधिकारी विष्णु चव्हाण, सहायक प्रकल्प अधिकारी भडंगे, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण चव्हाण, वदंना वानखेडे, लोणीकर, चटलेवाड, वीर, मुख्याध्यापक इंगोले, खडीकर, सपकाळ, घड्याळे, कावळे, सेदाने, हजारे, बागेश्वर तसेच कार्यालयीन कर्मचारी अनिल इंगळे, रवी पवार, शुभम धुमाळे, तेजस साठे, रजनिश भारती, पांडुरंग जाधव उपस्थित होते.
या दरम्यान स्वागत गीत, नृत्य यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बलराज राठोड व प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी प्रेरणादायी विचार मांडले. या प्रकल्पस्तरीय क्रिडास्पर्धेमध्ये वसंतपुर व हर्षी या दोन्ही केंद्राच्या जवळपास 600 खेळांडुनी सहभाग नोंदविला. उद्घाटनानंतर लगेच सांघिक खेळाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले. संचलन एन. डी. राऊत यांनी केले तर आभार एम.पी.लहाने यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीमधील सर्व सदस्य व वसंतपुर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.