संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांना आधुनिक शेती व शेती आधारित व्यवसायची माहिती व्हावी आणि त्यातून त्यांचे जीवनात समृद्धी यावी या उद्देशाने कन्हान येथे कृषि प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय कृषी प्रदर्शनी चे उदघाटन माजी आमदार डी एम रेड्डी यांचा हस्ते काल 16 फेब्रुवारीला मोठा थाटात करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत लक्ष्मण मेहर, संकेत बावनकुळे , हुकूमचंद आमदारे, नरेश बर्वे, दयाराम भोयर, कन्हान पोलीस स्टेशन चे ठाणेदार मकेश्वर, विजय हटवार, व्यंकट कारेमोरे, बाळकृष्ण खंडाईत, कैलास खंडार व इतर मान्यवर मोठ्या संख्येत हजर होते.
या प्रदर्शनीत जवळपास 60 ते 70 विविध प्रकारे चे स्टॉल्स आहेत ज्यात ट्रॅक्टर, शेती यंत्र, बियाणे, खत, नर्सरी, औषध, बटर -तितर, बचत गटाचे तसेच इतर ही माहितीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी 3 ते 4 हजार लोकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली. ही प्रदर्शनी 19तारीख पर्यंत चालणार आहे. या कृषि प्रदर्शनी सोबतच रोज वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. उदघाटनाच्या प्रसंगी पहिल्या दिवशी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.17 ला महिला मेळावा घेण्यात आला आहे तसेच 18 ला लावणीचा कार्यक्रम व 19 फेब्रुवारीला बक्षीस वितरणने कार्यक्रमाचे समापन समारोह होणार आहे.