नागपूर :- दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा येथे ३ दिवसीय (दि. २७ ते २९ जानेवारी २०२४) “फार्मा युथ फेस्टीव्हल अमोघ उर्जा-२०२४” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आज दि. २७/०१/२०२४ ला सुप्रसिद्ध गायक श्री निरंजन बोबडे आणि सहगायक पार्वती नायर यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन पार पडले. यावेळी मंचावर अंबे दुर्गा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, व्यवस्थापक प्रतिनिधी वैशाली बालपांडे, प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, डॉ. नितीन दुमोरे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निलेश महाजन व सचिन मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक कौशल्य विकसित करण्यासाठी करण्यात आले आहे.
अमोघ उर्जा या कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी विविध खेळ (वॉलीबॉल, कॅरम व बुद्धिबळ) व कल्चरल फेस्ट अंतर्गत (डांस व गायन) स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण १४१ कॉलेज सहभागी झाले आहेत व एकूण १८०० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटातील समीर शेख, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस नागपूर विद्यापीठ, नागपूर चा विद्यार्थी विजेता ठरला व अमन शिंगाडे, मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गोंदिया ह्या उपविजेत्या घोषित झाल्या. तसेच शिक्षक गटातील प्रा.राजेश गौतम, बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, साकोली चे शिक्षक विजेता ठरले व प्रा.स्नेहल श्रीवास्तव, साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर ह्या उपविजेत्या घोषित झाल्या. बुद्धिबळ स्पर्धेचे पंच प्रवीण पानतावणे व शिक्षक समन्वयक डॉ. मंगेश गोडबोले हे होते.
कॅरम स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटातील प्राजल डोर्लीकर, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर ची विद्यार्थीनी विजेता ठरली व झोया फातिमा शेख, सेन्ट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी, लोणारा ह्या उपविजेत्या घोषित झाल्या. तसेच शिक्षक गटातील बालपांडे कॉलेज मधील प्रा. रुची शिवहरे ह्या विजेता व के.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, सावनेर च्या प्रा. करिष्मा कुथे ह्या उपविजेता ठरल्या.
गायन स्पर्धेमध्ये विद्यार्थी मुलांच्या गटातील श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, वाडी या महाविद्यालयातील जयेश चरडे हे विजेता व प्रणय आसोले हे उपविजेता ठरले. तसेच मुलींच्या गटातील कु. चिन्मयी बोंडे हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी, चंद्रपूर हि विजेता तर आणिका शेख प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ फार्मसी, हिंगणा ह्या उपविजेता ठरल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले.