सोमवार १८ डिसेंबर रोजी हलबा आदिवासांचा भव्य मोर्चा

– हलबा, हलबी आदिमांची राष्ट्रीय परिषद

नागपूर :-राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने विणकर कॉलनी मानेवाडा येथे झालेल्या 18 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्यात आला. दक्षिण नागपुरातील माजी सभापती तथा नगरसेवक व कार्यक्रमाचे संयोजक राजेन्द्र सोनकुसरे यांनी सभेचे आयोजित केली होती. यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

सर्वांना १७ तारखेची हलबा,हलबी आदिम परीषदेला लोकनेता रा.भा.कुंभारे पुतळा गांधीबाग नागपुर या ठिकाणी,तसेच १८ तारखेच्या विधानभवनावर विराट मोर्चा ला उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती करण्यात आली.

सभेचे अध्यक्ष धनंजय धापोडकर ,तसेच आदिम नेता नंदा पराते, ओमप्रकाश पाठराबे अध्यक्ष आदिम युथ फाऊंडेशन, ॲड.वसंत कोहाड, मुन्ना खडतकर सामाजिक युवा कार्यकर्ता,  राजेन्द्र सोनकुसरे माजी सभापती/नगरसेवक, अनिल नंदनवार अध्यक्ष जेसीआई, नागपुर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना परीषद आणि मोर्चा ला सहकुटूंब येण्याचे आवाहन केले.

समाजातील आकाश पौनीकर राह.वाकोडी यांनी समाजाच्या सत्य परिस्थितीवर विणकर कॉलनी येथील सभेत पथ नाटय़ सादर केले. अनील नंदनवार यांनी आभार प्रदर्शन केले. हलबा समाज सांस्कृतिक मंडळ बेसाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ,सचिव तसेच बरेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात घनश्याम बारापात्रे राजेश येवलेकर, जगदीश चांदेकर,प्रदीप लिखार, प्रदीप मोहाडीकर अजय वाघ रिंकू सातपुते,वसंता बावणे, पांडुरंग पराते ज्ञानेश्वर धाढे महादेव खापेकर प्रशांत सोनकुसरे संपूर्ण टीम व याशिवाय महिला सदस्य ममता सोनकुसरे, अर्चना हेडाऊ,सारिका निनावे, मनीषा नगरधनकर, संगीता हेडाऊ, दीपिका बोरकर,लता हेडाऊ व इतर महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निशुल्क कैंसर जांच शिविर को भारी प्रतिसाद

Wed Dec 13 , 2023
नागपुर :- कल्याण मित्र फाउंडेशन द्वारा आयोजित स्वास्थ्य शिविर विजयनगर भरतवाडा रोड बस्ती में, स्वामी विवेकानंद विद्यालय के परिसर में संपन्न हुआ। इस शिविर में ११५ लोगों ने लाभ प्राप्त किया। हीमोग्लोबिन और कैंसर जाँच शिबिर का आयोजन किया गया । शिविर में रक्त परीक्षण, स्तन कैंसर, मुख कैंसर एवं अन्य कैंसर की जांच की गई साथ ही नियमित बीमारियों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com