संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23:- कामठी तालुक्यातील सार्वजनिक तारा माता मंदिर न्यू येरखेड्याच्या वतीने अश्विन नवरात्र च्या पर्वावर अखंड मनोकामना ज्योतीची स्थापना करण्यात आली होती अखंड ज्योत मिरवणुकीचे थाटात विसर्जन करण्यात आले अश्विन नवरात्रीच्या पर्वावर सार्वजनिक तारा मातामाय मंदिरात 51 अखंड मनोकामना ज्योतीची स्थापना करण्यात आली होती तारा माता मंदिराचे संस्थापक टिकाराम भोगे गुरुजी यांचे हस्ते पूजा ,आरती ,करून अखंड मनोकामना ज्योत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल, ताशे ,फटाकाच्या आतिषबाजीत निघालेली मिरवणूक तारा माता मंदिर चौक ,टीचर कॉलनी, झेंडा चौक, दुर्गा चौक, तेलीपुरा मार्गे नगर भ्रमण करीत श्रीक्षेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे अखंड मनकामना ज्योतीचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले मिरवणुकीत नविन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश ठाकूर,कामठी तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष व माजी सरपंच मंगला कारेर्मोरे ,कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते ,माजी सरपंच मनीष कारेमोरे ,सरपंच सरिता रंगारी ,उपसरपंच मंदा बाबाराव महल्ले पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोयर ,आचल तिरपुडे, गजानन तिरपुडे ,कुलदीप पाटील,राजेश पिपरेवार, अमोल घडले ,मंदिराचे कार्याध्यक्ष जगदीश झाडे ,सचिव सुदाम राखडे, उपाध्यक्ष घनश्याम कारेमोरे ,मधुकरराव ढोले, वसंतराव फायदे , मुरलीधर पारधी, मनोहर पारधी ,वसंतराव गुजेवार, दास बाबू, भाऊराव देशमुख ,प्रवीण फायदे , प्रा किशोर ढोले, प्रा मनीस मूळे, रुपेश पारधी ,भोजराज आंबाडकर ,शंकरराव भुजाडे ,रूपचंद चामट, सुषमा राखडे ,रमेश कारेमोरे ,अशोक कारेमोरे ,शीला देशमुख ,मीना दास ,यश ढिमोले, शोभा रेवतकर, मोनिका शेंडे,उषा कारेर्मोरे , नंदा झाडे ,वसला गुजेवार, घनश्याम गुजेवार ,रेणुका गुजेवार मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते