– 657 नागरिकांना चष्म्यांचे वाटप
– खा. कृपाल तुमाने शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे आयोजन
नागपूर :- उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षामार्फत जिल्हाभर आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. आरोग्य शिबिरात 789 रूग्णांनी नोंदणी केली. तर 657 रूग्णांना चष्मे वाटप आणि 127 रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. त्याचबरोबर 15 नागरिकांचे आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था देखील खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आली आहे.
खासदार तुमाने यांनी शिबिराची पाहणी करत वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, उमरेड विधानसभा प्रमुख संगीता किरपाने, महिला तालुका प्रमुख दुर्गाताई वाडकी, भिवापूर तालुका प्रमुख रूपराव घिरडे, पंचायत समिती सदस्य मिनाक्षीताई कावठे, सरपंच शालिनी गिल्लोरकर, नंदकिशोर दंडारे, वैद्यकिय कक्ष समन्वयक सुरेंद्र गिरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.