उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून

नागपूर :- देशाच्या समृद्धीत भर टाकणाऱ्या उद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. ‘नोकर नाही, मालक व्हा, आणि इतरांना नोकऱ्या द्या’ असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे. सहाव्या ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. हे प्रदर्शन अमृत भवन आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ आयोजित करण्यात आले आहे आणि ते दिवसभर सुरू राहील.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सीएसआर फोरमचे अध्यक्ष गिरधारी मंत्री उपस्थित राहणार आहेत. ग्रामायण प्रतिष्ठान २०१२ पासून ग्रामीण भागातील विविध उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहे. या प्रदर्शनात ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीचे उत्पाद, पारंपरिक व पर्यावरणपूरक वस्तू, बचत गटांचे उपक्रम आणि स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन होणार आहे.

तसेच कौशल्य विकास कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्पर्धा, CSR आणि दाते यांच्यासोबत जोडणारे उपक्रम राबवले जाणार आहेत. कला दालनात बांबू आर्ट, गोंडी आर्ट, मातीचे काम, कचऱ्यातून तयार केलेल्या कलाकृती यांचे आकर्षण असेल. ई-वेस्ट कलेक्शनमध्ये जुने कपडे व साड्या गोळा करून त्यापासून पिशव्या तयार केल्या जातील. सरकारी योजनांची माहिती व सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणारे स्टॉल्सही उपलब्ध असतील.

पाच कुटुंबांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार

सहाव्या ग्रामायण प्रदर्शनात सुवर्ण महोत्सवी पिढिजात परंपरागत उद्योग/व्यवसाय करणाऱ्या पाच कुटुंबांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे. उद्यमशीलतेला वाव देणारे, उत्पादक, उद्योजक, स्टार्टअप, शेतकरी आणि स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी अभिमानाचा विषय आहे.

प्रदर्शन दैनंदिन कार्यक्रम:

१६ जानेवारी (पहिला दिवस):

उद्घाटन ४ वाजता

१७ जानेवारी (दुसरा दिवस):

वेळ: दुपारी २.३० ते ४.३०

सर्वांसाठी समरस्फूर्त भाषण स्पर्धा

ज्येष्ठांसाठी पटापट प्रश्न स्पर्धा

ज्येष्ठांसाठी जलद चालणे स्पर्धा

ज्येष्ठांच्या निबंध स्पर्धा

महिलांची रांगोळी स्पर्धा

सर्वांसाठी खुली निबंध स्पर्धा

व वेळेवर स्पर्धांचे पुरस्कार वितरण

१८ जानेवारी (तिसरा दिवस):

वेळ: दुपारी २ ते ५

शालेय विद्यार्थ्यांच्या विविध पर्यावरणपूरक स्पर्धांचा निकाल जाहीर व बक्षीस वितरण

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे सादरीकरण

स्पर्धा: इकोब्रिक्सपासून वस्तू, मातीविरहित बाग, पथनाट्य, पर्यावरण पूरक विज्ञान मॉडेल, पर्यावरण पूरक शाळा

१९ जानेवारी (चौथा दिवस):

स्वच्छता दूत सत्कार, सत्कार किट व सन्मान निधी वाटप

कचऱ्यातून कला कार्यशाळा (श्री साटोणे)

कचऱ्यातून कला वस्तू मॉडेल प्रदर्शन (साधना फडकर, प्रतीक लांजेवार)

स्वच्छता क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचा परिचय व सन्मान

स्वच्छतेशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन

लघुपट प्रदर्शन

२० जानेवारी (पाचवा दिवस):

वेळ: ४ ते ६

सुवर्ण महोत्सवी जोडीदारांचा सत्कार

ज्येष्ठ समाज योद्धा पुरस्कार वितरण

सुवर्ण महोत्सवी पिढिजात परंपरागत उद्योग/व्यवसाय करणाऱ्या पाच कुटुंबांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार

सेवा स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर कार्यशाळ

समारोप

रोज रात्री ७.३० ते ८.३० – सांस्कृतिक कार्यक्रम:

देवी अहल्याबाई होळकर यांच्या जीवनावर पोवाडा

आपले विनीत

एड. चंद्रकांत रागीट

मिलिंद गिरीपुंजे

रमेश लालवानी

प्रशांत बुजोणे

राजेंद्र काळे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एल.एस. स्पोर्टींगचा दुहेरी विजय - खासदार क्रीडा महोत्सव सॉफ्टबॉल स्पर्धा 

Mon Jan 13 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये एल.एस. स्पोर्टींग नागपूर संघाने महिला आणि पुरुष गटात दुहेरी विजय नोंदविला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथ ही स्पर्धा सुरु आहे. रविवार 12 जानेवारी रोजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एल.एस. स्पोर्टींग ने महिला गटात एन.के. भंडारा संघाचा 7-0 ने आणि पुरुष गटात यवतमाळ संघाचा 10-0 ने पराभव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!