संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यतील मौजा पांढरकवडा येथे रा.अ.सु.अभियान भात पड़ हरभरा पिक प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वाटप करुन श्री. भैय्यालाल रामलाल यादव यांच्या शेतावर हरभरा बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे फायदे, बुरशीनाशक व रायझोबिअम यांची क्रमवारी बिजप्रक्रिया करण्यात आली, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पट्टा पद्धतीने पेरणी करून घेण्यात आली.यावेळी कृषि पर्यवेक्षक विलास गावंडे, कृषि सहायक अश्विनी साखरे, पोलीस पाटील अंकित रेवतकर, प्रगतशील शेतकरी विष्णु ठाकरे, ऋषिकेश खंडाळे,महेंद्र वाटकर, रंजना वाटकर, शोभन ठाकरे,अजय घोडमारे, प्रविण खंडाळे, परशराम केमेकर, व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.