खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न चुकता गेल्या दहा वर्षापासून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणारे गिरीष बापट यांच्या जाण्याने व्यक्तिगत हानि :- अँड. सुलेखाताई कुंभारे.

Wed Mar 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – राज्यमंत्री असतांना पासून दिवंगत गिरीष बापट यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. कोणत्याही राजकीय पदावर नसतांना सुध्दा गेल्या 10 वर्षा पासून त्यांनी न चुकता माझ्या वाढदिवसाला लेखी पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत असत. गिरीष बापट हे ख-या अर्थाने लोक नेता होते. त्यांनी पक्षा पलीकडे नातं जपलं. अशा या जनसामान्य नेत्याला माझी भावपूर्ण श्रध्दांजली. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com