नागपूर, दि.05 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज येथील राजभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी उद्या, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.