बुलडाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी चार वाजता मंदिरास भेट दिली. पोलिसांच्या मानवंदनेनंतर त्यांनी मंदिरातील गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राममंदिर, तसेच महाराजांच्या गादीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आले. तसेच संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी राज्यपाल यांचा सत्कार केला. तसेच राज्यपाल यांना श्री गजानन महाराजांची मुर्ती भेट दिली. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, आकाश पुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील आदी उपस्थित होते .
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले संत गजानन महाराजांचे दर्शन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com