– घर चलो अभियानांतर्गत रेड्डींचे उद्गार
– भाजपा च्या घर चलो अभियानाने पकडली गती
रामटेक :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, रामटेकच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मागच्या ९ वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी योजनांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे. नुकतेच रामटेक शहरात माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी घराघरात व दुकानात जाऊन मागच्या नऊ वर्षातील सरकारने केलेल्या कामाची माहिती नागरिकांना देण्यात आली, दरम्यान यावेळी शासनाच्या योजना सर्वसामांन्यांसाठी हितकारी असल्याचे रेड्डींनी नागरिकांना सांगीतले.
घर चलो अभियानादरम्यान रेड्डींनी अनेक दुकानदार तथा घराघरातील नागरीकांशी संबोधन केले. बहुतांश योजना अशा आहेत की त्या परिपूर्णरित्या साधारण व्यक्तीला समजून येत नाही तेव्हा या अभियानाच्या अनुषंगाने नागरिकांच्या दारी जाऊन त्यांना या सर्व योजनांची माहिती द्यावी व त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करावे असा उद्देश या अभियानाचा असल्याचे यावेळी रेड्डींनी माहिती देतांना सांगीतले. यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा भाजपा अध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा भाजपा महामंत्री किशोर रेवतकर, रामटेक विधानसभेचे निवडणूक प्रमुख सुधाकर मेंघर, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तालुकाध्यक्ष नरेंद्र बंधाटे,राहुल किरपान, जीवन मुंगले,नंदकिशोर कोहळे, डॉ. विशाल कामदार, माजी नगरसेवक संजय बिसमोगरे, रामानंद अडामे, आलोक मानकर, वणमाला चौरागडे, उज्ज्वला धमगाये, विजय हारोडे, करीम मालाधरी, प्रकाश मोहारे, ज्ञानी दमाहे, राधेश्याम गराडे आदी भाजपा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.