रोहयो अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – रोहयो मंत्री संदीपान भुमरे

मुंबई  : ‘रोहयो’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

राज्यातील रोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या ३५०० कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री भुमरे बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, संजय गायकवाड, संजय बनसोडे, महेंद्र दळवी, अपर मुख्य सचिव नंदकुमार, यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, राज्यातील ‘रोहयो’अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करून त्यावर तातडीने अहवाल मागविण्यात येईल. मानधन वाढ तसेच इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री  भुमरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना सांगितले तसेच राज्यभर सुरू असलेला संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

Fri Feb 3 , 2023
दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत मुंबई : मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com